राजकन्या राधाबाई साहेब गायकवाड यांचे चित्र
१० मार्च, १८९४ रोजी शाहू महाराजांना झालेल्या पहिल्या कन्या राधाबाई उर्फ आकासाहेब महाराज आता उपवर झाल्या होत्या. महाराजांनी या कन्येला आपली आई 'राधाबाई' यांचेच नाव ठेवले होते. महाराजांच्याच स्वभावावर जन्मलेल्या आक्कासाहेब महाराज यांचा विवाह देवासचे तुकोजीराव पवार यांच्याशी निश्चित करण्यात आला. या विवाहाची २१ मार्च, १९०८ ही तारीख निश्चित करण्यात आली.
राधाबाई साहेबांचे छायाचित्र
या विवाहप्रसंगाचा शुभमुहूर्त पकडून शाहू महाराजांनी भुदरगड तालुक्यातील वळिवडे हे मुख्य ठाण्याचे ठिकाण गाव कल्पून आणि ठाण्याच्या आसपासचा ८३ गावांचा नवा महाल धरून त्याला 'राधानगरी' हे नाव दिले. हे नवे नाव बहाल केल्यानंतर आक्कासाहेब महाराज यांचे थाटाने लग्न होणार, याची जाणीव प्रजाजनांना आली होती आणि झाले तसेच ! विवाहसोहळा पार पाडण्यासाठी बापूसाहेब महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीने आपली कामगिरी फत्ते केली. करवीरनगरी सजविण्यात आली. वन्हाड उतरविण्याची सोय पंत अमात्य बावडेकरांच्या भव्य वाड्यात करण्यात आली. बंगले, वाडे आणि प्रसादतुल्य इमारती पाहुण्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.
- संधर्भ शाहूंच्या आठवणी


No comments:
Post a Comment