आज सकाळी पेपरमध्ये एक बातमी वाचली , पुण्याच्या MBA चहावाल्याची घेतलेली ती मुलाखत होती दिवसाला 2000-3000 रुपये व महिन्याला 60000 ते70000 रुपये निव्वळ नफा तो कमावतो असे त्याचे म्हणणे होते .
दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या महानगरात असे MBA चहावाले ,इंजिनिअरिंग वडापाव वाले सर्रास आपल्याला दिसून येतात नवीन ट्रेंड म्हणा की आणखी काही पण आपल्या डीग्र्या चाह कींवा वडा च्या गाडीवर लाऊन यांना व्यवसाय करण्यास गर्व वाटतो ,आपण करत असलेल्या व्यवसायबद्दल स्वाभिमान असणे गरजेचे च आहे करण कोणतेच काम छोटे नसते पण याचा दोष आपण घेतलेल्या शिक्षणावर टाकणे कितपत योग्य आहे? त्याच मुलाखतीत तो सांगतो की मी घेतलेले शिक्षण कसे व्यर्थ गेले , आणि त्यांनी MBA इंजिनिअरिंग किंवा इतर उच्च शिक्षण घेऊन कशी चूक लोक करतात.
स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतेही उच्च शिक्षण आपल्याला असे लोक सर्रास आढळून येतात जे आपल्या नाकर्तेपणाचा दोष आपण घेतलेल्या उच्च शिक्षणाला देतात ,असे अनेक मोटीवेशनल स्पीकर मराठी मध्ये ही आहेत जे नेहमी स्पर्धा परीक्षा ना बेरोजगारांचा अड्डा संबोधतात असाच एक जण सोशल मीडिया वर ही आज काल खूप प्रसिद्ध होताना मी पाहिला आहे जो युवकांना संबोधत असतो की त्याने कशी आयुष्याची 3-4 वर्ष पुण्यात वाया घालवली आणि आता तो कसा त्याच्या व्यवसायात यशस्वी आहे ..! मला अश्या लोकांना एक प्रश्न विचारू वाटतो की जर तुम्ही एखाद्या गोष्टीमागे आयुष्याची 3-4 वर्ष वाया घालवत आहात आणि तरी ही तुम्हाला त्यात यश मिळत नाही तर यात त्या शिक्षणाचा किंवा कामाचा काय दोष? तुमच्या अपयशामागे अनेक कारणे असतील पण याचा अर्थ असा नाही की ते शिक्षणच व्यर्थ आहे .
मराठी मध्ये एक सुंदर म्हण आहे 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे ' ती इथे तंतोतंत लागू होते.
आपल्या बेरोजगारी चे कारण फक्त पदवी आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे
एखादा मुलगा जेंव्हा उच्च शिक्षणासाठी अर्ज करतो त्यामागे अनेक पैलू काम करत असतात तो मुलगा त्या क्षेत्रातील पदवी ही अनेक कारणास्तव घेऊ शकतो त्यात येतात; त्याची आवड , घरच्यांचा दबाव , पदवी ही फक्त आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे साधन अशी कुस्चीक मानसिकता , क्षेत्र निवडीवेळी मुलाची मानसिकता ,त्या क्षेत्राविषयीची अपूर्ण माहिती ,आणि भविष्याचा कोणताही आराखडा न आखता उचललेले पाऊल. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर आपण क्षेत्र कोणतेही असले तर यशप्राप्ती करू शकतो , काही वेळा मुलाच्या मानसिकतेवर घरची परिस्थिती , आजूबाजूच्या लोकांचा कोणत्यातरी एक क्षेत्राकडे असणारा कल या गोष्टी खोलवर आघात करतात व ते भावनेच्या भरात कोणताही विचार न करता चुकीचा निर्णय घेतात मग नंतर आलेले अपयश शिक्षणाच्या माथी मारून रिकामे होतात . कोणत्याही क्षेत्रात उतरताना आपल्याला त्या क्षेत्राची सध्याची स्थिती आणि जेंव्हा आपण पदवी घेऊन बाहेर पडू त्या वेळेची स्थिती या दोन्हीचा अंदाज असणे गरजेचे आहे . जरी आपला निर्णय चुकला असेल तर भांबावून न जाता आहे त्या क्षेत्रात उच्च कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा कारण एखाद्याला दोष देऊन आपण सध्या ची स्थिती तरी नाही बदलु शकत . पाश्चात्य देशात एक Socrates नावाचा मोठा विचारवंत होऊन गेला त्यानं म्हटलं होतं 'winner of blame game is always discordant of real game'
आज देशात इंजिनिअरिंग चा एम्प्लॉयमेंट रेट 1.2 % आहे म्हणजे प्रत्येकी 10 मधल्या फक्त 1 किंवा 2 नवख्या पदव्युत्तर युवकांना आज नोकरी मिळते , मग उरलेल्या 8-9 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कुठे कमी होती का हा प्रश्न युवक वर्गाकडून नेहमी विचारला जातो आणि तो तथ्य पूर्ण आहे ही......8-9 विद्यार्थी हे सगळे गुणवत्ता हीन आहेत असं आपण नाही म्हणू शकत पण यांच्यात गुणवत्ता हिनतेची संख्या 50% जरी धरली तरी उरलेले 50% लोकांना गुनवत्ता याअसून देखील नोकरी का मिळत नाही हा प्रश्न उरतोच .......या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असे लक्षात येईल की देशात दरवर्षी कमीत कमी 50-60 लाख मुले ही नुसत्या इंजिनिअरिंग किंवा ज्याला आपण अभियांत्रिकी म्हणतो ,मधून पद्युत्तर होऊन बाहेर पडतात पण भारतात आजचा नोकरी दर पाहता इतक्या लोकांना नोकरी देणे हे शक्य होत नाही मग असे विध्यार्थी एक तर IT क्षेत्राकडे वळतात किंवा स्वतः चा व्यवसाय उघडतात , अश्या गोष्टींचा फायदा मोठं मोठे उद्योजक घेतात आणि अश्या युवकांना कमी वेतनावर नोकरी करावी लागते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे IT क्षेत्र !
मग अश्या भ्रमनिरास झालेल्या युवकांच्या मनात आपल्या पदवी विषयी हिनतेची आणि क्रोधाची भावना उत्पन्न होते आणि मग ते आपण घेतलेल्या पदवीला दोष देत बसतात , म्हणण्याचा हेतू हा की जर एखादापदवीधर गुणवत्तापूर्ण विध्यार्थी आपल्या क्षेत्रात अपयशी ठरत असेल तर त्यामागचे कारण ही त्याची पदवी नसून सध्याची परिस्थिती आहे . आणि परिस्थिती कधी एकसारखी राहत नसते ,आता IT क्षेत्राचच बघा ना 2015-16 साली IT क्षेत्राचं सरासरी वार्षिक वृद्धी दर हा 2.7% इतका होता तो आज वाढून 17.21% इतका झाला आहे IT क्षेत्रा मध्ये झालेल्या या वाढीत अनेक घटक जवाबदार आहेत त्यात कोरोना चा ही समावेश होतो ज्यामुळे भारताचे 80% काम हे ऑनलाइन मोड वर शिफ्ट झाले पण डिमांड सप्लाय रुल चा जर आपण विचार केला तर ज्या क्षेत्रात आज स्कोप नाही असं म्हणून विध्यार्थी आपल्या पदवी ल दोष देत बसलेत ते ही क्षेत्र कदाचीत भविष्यात उच्चांक गाठेल.
या अश्या घटना टाळण्यासाठी आपण आपले निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत हे मात्र नक्की पण जरी निर्णय चुकले तरी पदवी ला दोष न देता आपण ज्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो तिथे प्रयन्त करावे .
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकात त्यांनी एक सुंदर वक्तव्य लिहिलं आहे "आपण जर एखादा दगड आकाशात भिरकावला तर तो आपल्याच डोक्यात येऊन पडणार हा जसा गुरुत्वाकर्षणचा नियम आहे तसेच आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या आपनच कारणीभूत असतो मग यश जरी आले तरी ते आपल्यामुळेच आणि अपयश जरी आले तरी ते आपल्यामुळेच हा कर्म सिद्धांत आहे.!"
No comments:
Post a Comment