Saturday, September 17, 2022

चित्तींनीचे शाहू राज्यांवरचे प्रेम...!

       आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्या वाढदिनी 8 चित्ते निर्यात केले हे समजताच,आज कोल्हापूरच्या चित्यांच्या निर्याती च्या आठवणी ताज्या झाल्या त्यातच छ.शाहू महाराजांवर चित्यांचे प्रेम किती होत ते आज एका किस्यातून जाणून घेऊयात.

शालिनी राजे
(शालिनी पॅलेस ह्यांच्या नावावरून नामकरण झाले)

        राजर्षी शाहू महाराजांचे जसे जनतेवर प्रेम होते, तसेच त्यांचे जी प्रेम होते. जनावरांना, श्वापदांना आपण प्रेम दिले की तीही आपल्यावर तेवढेच प्रेम करतात, हे महाराजांनी सिद्ध करून दाखविले होते. प्रेमात शक्ती असते, त्यात चमत्कारदेखील असतो. महाराजांनी सोनतळी कॅम्पवर एका खुनशी पिल्याला पाळले होते.आजतागायत तरी अशा चित्त्याला कोणी पाळले नव्हते, परंतु महाराजांनी है अशीत करून दाखविले होते. तसेच महाराजांजवळ आफ्रिकन पित्याची एक मादीसुद्धा होती. या मादीला बालपणापासून महाराजांनी ला लावला होता. ही बंधमुक्त मादी महाराज कॅम्पवर आले की त्यांच्या अवतीभोवतीच सतत वावरत असे. हरणांच्या कळपातील फक्त काळविटाचीच शिकार करण्याची कला महाराजांनी तिला शिकविली होती. आफ्रिकन चित्ता व चित्तीण महाराजांनी पाळली आहे, ही खबर इतर संस्थानिकांनाच नव्हेतर ब्रिटिशांनादेखील खरी वाटत नसे. चित्तीण तर बंधमुक्त असते, यावरदेखील कोणी विश्वास ठेवीत नसत.. महाराजांच्याजवळ देशोदेशींचे अनेक चित्ते होते. महाराजांजवळ एक नागपुरी चित्ता व माजात आलेली वरी, चित्तीण होती. आफ्रिकन चित्ता-चित्तीण एकत्र आणण्यापेक्षा नागपुरती चित्ता आणि आफ्रिकन चित्तीण यांच्यात संकरित जात निर्माण करावी म्हणून महाराजांनी या दोघांना रायबागच्या जंगलात सोडून दिले.

चित्ता आणि चित्तेवान

 दोघांची जोडी जमली. दिवसभर ते जंगलात भक्ष्य शोधण्यासाठी इतस्ततः एकत्र फिरत व रात्र होताच परतत. महाराजांनी रायबागच्या ज्या शिकारखान्यात त्यांना ठेवले होते, तिथे ते परत येत व परत पहाटेच्यावेळी ते जंगलात जात. असेच काही दिवस निघून गेल्यावर त्या उभयतांच्यात रानटीपणा वाढला. आता माणूस दिसला की ते दूर दूर पळू लागले. एक दिवस काय झाले कोणास ठाऊक त्या चितणीने व चित्त्याने एकाएकी जंगल सोडून दिले व पूर्वी महाराजांनी त्या चित्तीणीला वा शिकारीनिमित्त ज्या ज्या शिकारतळांवरून फिरविले होते, तिथे तिथे ते उभयता जाऊन पोहोचले. चित्तीणीला महाराजांचा अधिक लळा असल्यामुळे तिने पुढे होऊन शिकरतळांचा कानाकोपरा पालथा घातला. तिथे तिला कोठेही महाराज दिसले नाहीत ती नाराज झाली. कोणत्याच शिकारतळावर महाराज नाहीत. म्हटल्यावर ते दोघे भिर्डीला आले. तिथेही महाराज नव्हते. तिथून पुढे सौंदत्ती, जुंगूळ, शेडबाळरून ते दोघे दानवाडला आले. तिथेही महाराज नाहीत है। कळल्यावर पंचगंगा नदी पार करून हुपरी, रेंदाळ पार्कात आले. नंतर सरळ कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील कागल नाक्याजवळ आले. चित्तीण तर पुढे पुढे सारखी धावतच होती.


चित्तेवान इस्माईल रेहमान


पाठीमागून तो नर येत होता. कागलजवळ आल्यावर चित्तीणीच्या लक्षात आले की, चित्ता आपल्यासोबत नाही. त्या चित्त्याला शोधण्यासाठी ती टेकडीवर चढली. टेळहणी करू लागली. तिला तो चित्ता कोठेच दिसला नाही. त्याचा नाद तिने सोडला व धावतच ती महाराजांच्या कोल्हापुरातील स्टेशन बंगल्याच्या आवारात आली. तिथे असणारी माणसांची वर्दळ पाहून ती परत माघारी परतली ती सरळ महाराजांच्या बावडे बंगल्यावर आली. सुदैवाने महाराज यावेळी बंगल्यात होते. चित्तीण आल्याची खबर मिळताच महाराज धावतच बाहेर आले. महाराजांना पाहताच ती चित्तीण आनंदाने जागेवरच जोराजोरात हालचाल करू लागली. एकदम काय त्या चित्तीणीच्या मनात आले कोणास ठाऊक. महाराजांविरुद्ध बाजूला तोंड करून ती उभी राहिली. महाराजांनी ओळखले, ही आपल्यावर खूप रागावलेली आहे. महाराज तिच्याजवळ गेले, त्याबरोबर महाराजांना एकही नख न लागू देता तिने खूप चापट्या मारल्या. महाराजांना अक्षरशः इकडून तिकडे घोळसविले. महाराज म्हणाले, "बाई, माझं चुकलं. मी परत तुला जंगलात पाठविणार नाही." असे म्हणताच चित्तीण एकदम शांत झाली. तिला भूकसुद्धा लागली होती... महाराजांनी स्वतःच्या हातांनी तिला पोटभर खावयास घातले. पुढे काही दिवसांनी तो चित्ता परत सापडला. ही हकिकत महाराजांनी कर्नल वूडहाऊस यांना १९ डिसेंबर १९१९ रोजी पाठविली होती.

करवीर सौंस्थानातले 35 चित्ते



No comments:

Post a Comment