तारीख होती 14 सप्टेंबर 1893, पुण्याचा विंचूरकर वाड्यातून बाप्पाच्या आरत्यांचे आवाज आता चौकापर्यंत घुमू लागले 1857 च्या उठावा नंतर जी स्वातंत्र्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात जागी झाली होती तीच या आरत्यांच्या मागे घंटी सारखी वाजत होती . इंग्रजांच्या फुटीच्या राजकारणा मुळे भारतीय संस्कृती चा लोप होत होता अश्या स्थिती मध्ये एका संघटित शक्ति ची गरज होती जी या संपत चाललेल्या संस्कृती ला पुनः जागृत करेल;
सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा इतिहास बघता हे स्पष्ट होते की काळानुसार गणेशोत्सवाच्या स्वरूपात कमालीचा फरक पडला आहे जो उत्सव संस्कृती च्या संरक्षणासाठी सुरु केला होता त्यात आज सांस्कृतिक भाग किती शिल्लक राहिला आहे हे पुन्हा एकदा परखण्याची गरज आहे . सांस्कृतिक धार्मिक एकतेच्या जागी आता कुठे तरी परस्पर ईर्षेचा एक मुखवटा प्रत्येक गणेशोत्सव मंडळावर चढेलला दिसून येतो ,टिळकांनी किंवा त्या काळातील लोकांनी ज्या एका गणेशोत्सवाची कल्पना केली होती ती आता केवळ स्वप्नवत किंवा परिकल्पना बनली आहे मग ते मूर्ती आणण्याच्या तारखांचे वाद असोत किंवा विसर्जनावर होणारी बाचाबाची, स्थानिक पातळीवर सरकारने विसर्जनावावर काही प्रतिबंध आरोपीत केले आहेत हे आपण या वर्षीही पाहू शकतो ,नदी ,तलावा सारख्या नैसर्गिक स्रोतांचे होणारे नुकसान हे त्या मागचं कारण आहे असं प्रशासनाकडून प्रत्येक वेळी सांगितलं जातं , परंतु काही गणेशोत्सव मंडळ तसेच धार्मिक संघटनांना अस वाटत की हा प्रतिबंध आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर घातलेला घाव आहे पण यामागे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की कोणताही हिंदू सण हा निसर्गाशी ताळमेळ प्रस्थापित करूनच निर्मित केला आहे आणि तो आजचा नाही हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे.
पण मग प्रदूषणाचा विषय येतो कुठे? ही गोष्ट प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने समजून घेण्यासारखी आहे की मूळ सांस्कृतित गणपती च्या एका माती किंवा शाडुपासून बनवलेल्या प्रतिमेची प्रतिष्ठापना आणि विसर्जन करण्याचा प्रघात आहे. पण आपण आपल्या सोईनुसार आपण त्याचे रूपांतर पीओपी मध्ये केले कारण शाडूच्या मूर्तीचे वजन आणि उंची ही आपल्या वाढत्या महत्वकांक्षा आणि इर्षेला बाधक ठरत होती . शाडू च्या मूर्ती विसर्जनामुळे नदीच्या शेजारील शेतीना तसेच झाडांना माती मिळत होती ,तलावातील जलजीवन विस्कळीत होत न्हवते. पण पीओपी च्या वापररामुळे पाण्याचे स्वरूप आम्लधर्मी म्हणजे ऍसिडीक होते पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊन जलजीवन संपुष्टात येते एकूणच काय आपल्या स्वार्थापोटी आपण संस्कृती बरोबर प्रकृतीचा ही नाश करत आहोत !
The hindu मध्ये प्रकाशित वृतां नुसार अखंड महाराष्ट्रात 2022 च्या गणेशोत्सवा दरम्यान 37 युवकांनी आपले प्राण गमवले यातल्या 20 जणांना विसर्जनावेळी पाण्यात अडुकन तर बाकीच्या 17 जणांना दोन गणेशोत्सव मंडळात झालेल्या वादवादीमध्ये आपले प्राण गमवावे लागले.
हजारो वर्षे झाले, अनेक राजे आले अनेक राज्य अस्तित्वात आलीत आणि मातीमोल झालीत पण मागे राहिली ती संस्कृती मागे राहिला तो धर्म आपल्या एकतेचे कारण आणि गौरवाचे प्रतीक! आणि आज आपण आपल्या संस्कृतीचा आपल्या गौरवाचा ऱ्हास स्वतः करत आहोत का ? गणेशोत्सव नेहमीच आपल्याला आपल्या धर्माच्या प्राचीनतेची जाणीव करून देतो मग तो अफगाणिस्तानात सापडलेला 2500 वर्षापूर्वीचा काबुल गणेश असो किंवा कंबोडिया साऊथ आफ्रिका मध्ये साजरा होणारा गणेशोत्सव , युगानुयुगे विश्वव्यापी संस्कृती ही सनातनच होती याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कोणतीही घटना ही धडाक्याशिवाय घडली नाही तर मानवी लक्ष तिकडे केंद्रित होत नाही ही मानवी मनोवृत्ती आहे आज अफगाणिस्तान ,पाकिस्तान सारख्या देशात मंदिरे हिंदू देवी देवतांच्या मुर्त्या कश्या उध्वस्त केल्या जात आहेत याचे वृत्त आपण वाचतो आणि हळहळ व्यक्त करतो , पण आपण कधी ही सांस्कृतित आपल्या सोयीनुसार परिवर्तन करत आहोत हे मान्य करत नाही.. मग तो धर्मचा ऱ्हास नाही का ? आजकाल किती तरी गणेश मंडळे चतुर्थी च्या आधीच बाप्पाचे आगमन करताता आणि अनन्त चतुर्दशीनंतर दुसर्या किंवा तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते ज्याच्या मागचा उद्देश केवळ आपली वयक्तिक छाप सोडणे, काही तरी वेगळे करून लक्षवेधने किंवा आमचा बाप्पा दुसर्यापेक्षा वेगळा आहे आणि त्यामुळे तो दुसऱ्यांबरोबर विसर्जनात सहभागी करणार नाही असा मूर्ख अट्टाहास असतो. संस्कृती च्या नावाखाली आपल्या मंडळाच्या वयक्तिक महत्वकांक्षा ही अशी मंडळे पूर्ण करतात ज्या उत्सवाची सुरवात च धर्माच्या एकतेसाठी झालीं होती तोच आज आपण आपल्या आपल्यातल्या वादाचे निम्मित म्हणून वापरतो प्रत्येक गल्लीत 4-5 मंडळे ही सर्रास बघायला मिळतात आणि अनेकवेळा असंच दिसून येत की प्रत्येक मंडळाचा उदय हा एका मंडळापासून फुटून किंवा दोन गटांमधील वादामुळे झालेला असतो.
मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे ,बायका आणून नाचवणे मोठमोठे डॉल्बी लावून शक्तिप्रदर्शन करणे या गोष्टी मुळे मूळ उत्सवाची संकल्पना संपुष्टात आली आहे .बुद्धी दाता म्हणवल्या जाणाऱ्या गणपतीची खरी पूजा म्हणजे स्वतःच्या बुद्धी चा विकास होय. ज्या ताकतीने ज्या इर्षेने आपल्याच गल्लीतल्या दुसऱ्या मंडळाबरोबर आपण वाद घालतो त्याच शक्तीने आपण आपल्या देशासाठी का लढू शकत नाही?? शहरातल्या रस्त्यावर मिरवणुकी काढून मंडळाचा झेंडा अंगावर लपेटून आपल्याला धन्यतेची जाणीव होते , अस वाटत की जग जिंकलं !! ........पण देशा साठी लढून जेंव्हा त्याच शहराच्या रस्त्यावरून आपले शरीर तिरंग्यात लपेटून जाते ती असते खरी धन्यता, जो धर्म महाराजांनी आपल्याला शिकवला जी ताकत सह्याद्रिने आपल्याला दिली त्याचे प्रदर्शन दूर हिमालयाच्या कड्यावर उभा राहून करणे म्हणजे खरा पुरुषार्थ.! एखादया मुली बरोबर रिलेशन मग तिला घेऊन गणपती फिरणे , मंडळच्या पूजा अटेंड करणे म्हणजे असतो का खरा पुरुषार्थ ? आपला धर्म सांगतो या पृथ्वी वर लाखो जीवजन्तु जनावर अस्तित्वात आहेत प्रत्येकजण जन्म घेतो , सम्भोग करतो ,प्रजनन करतो आणि मरून जातो पण तुम्ही माणूस आहात त्यांच्या पेक्ष्या वेगळे आहात मग तुम्ही वेगळं अस काय केलं त्यांच्या पेक्षा??? उलट त्यांच्यापेक्षा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जास्त अटापीटा तुम्हाला करावा लागतो हे आपलं दुर्भाग्य !! कटू आहे पण सत्य आहे
संकल्पना : अपूर्व शेळके
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment