Tuesday, September 20, 2022

अशिक्षित पदवीधर.!!

                 आज सकाळी पेपरमध्ये एक बातमी वाचली , पुण्याच्या MBA चहावाल्याची घेतलेली ती मुलाखत होती दिवसाला 2000-3000 रुपये व महिन्याला 60000 ते70000 रुपये निव्वळ नफा तो कमावतो असे त्याचे म्हणणे होते .

 दिल्ली, मुंबई, पुणे  यांसारख्या महानगरात असे MBA चहावाले ,इंजिनिअरिंग वडापाव वाले सर्रास आपल्याला दिसून येतात नवीन ट्रेंड म्हणा की आणखी काही पण आपल्या डीग्र्या चाह कींवा वडा च्या गाडीवर लाऊन यांना व्यवसाय करण्यास गर्व वाटतो ,आपण करत असलेल्या व्यवसायबद्दल स्वाभिमान असणे गरजेचे च आहे करण कोणतेच काम छोटे नसते पण याचा दोष आपण घेतलेल्या शिक्षणावर टाकणे कितपत योग्य आहे? त्याच मुलाखतीत तो सांगतो की मी घेतलेले शिक्षण कसे व्यर्थ गेले , आणि त्यांनी MBA इंजिनिअरिंग किंवा इतर उच्च शिक्षण घेऊन कशी चूक लोक करतात. 

           


                स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतेही उच्च शिक्षण आपल्याला असे लोक सर्रास आढळून येतात जे आपल्या नाकर्तेपणाचा  दोष आपण घेतलेल्या उच्च शिक्षणाला देतात ,असे अनेक मोटीवेशनल स्पीकर मराठी मध्ये ही आहेत जे नेहमी स्पर्धा परीक्षा ना बेरोजगारांचा अड्डा संबोधतात असाच एक जण सोशल मीडिया वर ही आज काल खूप प्रसिद्ध होताना मी पाहिला आहे जो युवकांना संबोधत असतो की त्याने कशी आयुष्याची 3-4 वर्ष पुण्यात वाया घालवली आणि आता तो कसा त्याच्या व्यवसायात यशस्वी आहे ..! मला अश्या लोकांना एक प्रश्न विचारू वाटतो की जर तुम्ही एखाद्या गोष्टीमागे आयुष्याची 3-4 वर्ष वाया घालवत आहात आणि तरी ही तुम्हाला त्यात यश मिळत नाही तर यात त्या शिक्षणाचा किंवा कामाचा काय दोष? तुमच्या अपयशामागे अनेक कारणे असतील पण याचा अर्थ असा नाही की ते शिक्षणच व्यर्थ आहे .

मराठी मध्ये एक सुंदर म्हण आहे 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे ' ती इथे तंतोतंत लागू होते. 

आपल्या बेरोजगारी चे कारण फक्त पदवी आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे  

      एखादा मुलगा जेंव्हा उच्च शिक्षणासाठी अर्ज करतो त्यामागे अनेक पैलू काम करत असतात तो मुलगा त्या क्षेत्रातील पदवी ही अनेक कारणास्तव घेऊ शकतो त्यात येतात; त्याची आवड , घरच्यांचा दबाव , पदवी ही फक्त आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे साधन अशी कुस्चीक मानसिकता , क्षेत्र निवडीवेळी मुलाची मानसिकता ,त्या क्षेत्राविषयीची अपूर्ण माहिती ,आणि भविष्याचा कोणताही आराखडा न आखता उचललेले पाऊल. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर आपण क्षेत्र कोणतेही असले तर यशप्राप्ती करू शकतो , काही वेळा मुलाच्या मानसिकतेवर घरची परिस्थिती , आजूबाजूच्या लोकांचा कोणत्यातरी एक क्षेत्राकडे असणारा कल या गोष्टी खोलवर आघात करतात व ते भावनेच्या भरात कोणताही विचार न करता चुकीचा निर्णय घेतात मग नंतर आलेले अपयश शिक्षणाच्या माथी मारून रिकामे होतात . कोणत्याही क्षेत्रात उतरताना आपल्याला त्या क्षेत्राची सध्याची स्थिती आणि जेंव्हा आपण पदवी घेऊन बाहेर पडू त्या वेळेची स्थिती या दोन्हीचा अंदाज असणे गरजेचे आहे . जरी आपला निर्णय चुकला असेल तर भांबावून न जाता आहे त्या क्षेत्रात उच्च कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा कारण एखाद्याला दोष देऊन आपण सध्या ची स्थिती तरी नाही बदलु शकत . पाश्चात्य देशात एक  Socrates नावाचा मोठा विचारवंत होऊन गेला त्यानं म्हटलं होतं  'winner of blame game is always discordant of real game' 




आज देशात इंजिनिअरिंग चा एम्प्लॉयमेंट रेट 1.2 % आहे म्हणजे प्रत्येकी 10 मधल्या फक्त 1 किंवा 2  नवख्या पदव्युत्तर युवकांना आज नोकरी मिळते  , मग उरलेल्या 8-9 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कुठे कमी होती का हा प्रश्न युवक वर्गाकडून नेहमी विचारला जातो आणि तो तथ्य पूर्ण आहे ही......8-9 विद्यार्थी हे सगळे गुणवत्ता हीन आहेत असं आपण नाही म्हणू शकत पण यांच्यात गुणवत्ता हिनतेची संख्या 50% जरी धरली तरी उरलेले 50% लोकांना गुनवत्ता याअसून देखील नोकरी का मिळत नाही हा प्रश्न उरतोच .......या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असे लक्षात येईल की देशात दरवर्षी कमीत कमी 50-60 लाख मुले ही नुसत्या इंजिनिअरिंग किंवा ज्याला आपण अभियांत्रिकी म्हणतो ,मधून पद्युत्तर होऊन बाहेर पडतात पण भारतात आजचा नोकरी दर पाहता इतक्या लोकांना नोकरी देणे हे शक्य होत नाही मग असे विध्यार्थी एक तर IT क्षेत्राकडे वळतात किंवा स्वतः चा व्यवसाय उघडतात , अश्या गोष्टींचा फायदा मोठं मोठे उद्योजक घेतात आणि अश्या युवकांना कमी वेतनावर नोकरी करावी लागते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे IT क्षेत्र ! 


         मग अश्या भ्रमनिरास झालेल्या युवकांच्या मनात आपल्या पदवी विषयी हिनतेची आणि क्रोधाची भावना उत्पन्न होते आणि मग ते आपण घेतलेल्या पदवीला दोष देत बसतात , म्हणण्याचा हेतू हा की जर एखादापदवीधर गुणवत्तापूर्ण विध्यार्थी आपल्या क्षेत्रात अपयशी ठरत असेल तर त्यामागचे कारण ही त्याची पदवी नसून सध्याची परिस्थिती आहे . आणि परिस्थिती कधी एकसारखी राहत नसते ,आता IT क्षेत्राचच बघा ना 2015-16 साली IT क्षेत्राचं सरासरी वार्षिक वृद्धी दर हा 2.7% इतका होता तो आज वाढून 17.21% इतका झाला आहे IT क्षेत्रा मध्ये झालेल्या या वाढीत अनेक घटक जवाबदार आहेत त्यात कोरोना चा ही समावेश होतो ज्यामुळे भारताचे 80% काम हे ऑनलाइन मोड वर शिफ्ट झाले  पण डिमांड सप्लाय रुल चा जर आपण विचार केला तर ज्या क्षेत्रात आज स्कोप नाही असं म्हणून विध्यार्थी आपल्या पदवी ल दोष देत बसलेत ते ही क्षेत्र कदाचीत भविष्यात उच्चांक गाठेल. 



             या अश्या घटना टाळण्यासाठी आपण आपले निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत हे मात्र नक्की पण जरी निर्णय चुकले तरी पदवी ला दोष न देता आपण ज्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो तिथे प्रयन्त करावे .

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकात त्यांनी एक सुंदर वक्तव्य लिहिलं आहे "आपण जर एखादा दगड आकाशात भिरकावला तर तो आपल्याच डोक्यात येऊन पडणार हा जसा गुरुत्वाकर्षणचा नियम आहे तसेच आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या आपनच कारणीभूत असतो मग यश जरी आले तरी ते आपल्यामुळेच आणि अपयश जरी आले तरी ते आपल्यामुळेच हा कर्म सिद्धांत आहे.!"

Saturday, September 17, 2022

चित्तींनीचे शाहू राज्यांवरचे प्रेम...!

       आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्या वाढदिनी 8 चित्ते निर्यात केले हे समजताच,आज कोल्हापूरच्या चित्यांच्या निर्याती च्या आठवणी ताज्या झाल्या त्यातच छ.शाहू महाराजांवर चित्यांचे प्रेम किती होत ते आज एका किस्यातून जाणून घेऊयात.

शालिनी राजे
(शालिनी पॅलेस ह्यांच्या नावावरून नामकरण झाले)

        राजर्षी शाहू महाराजांचे जसे जनतेवर प्रेम होते, तसेच त्यांचे जी प्रेम होते. जनावरांना, श्वापदांना आपण प्रेम दिले की तीही आपल्यावर तेवढेच प्रेम करतात, हे महाराजांनी सिद्ध करून दाखविले होते. प्रेमात शक्ती असते, त्यात चमत्कारदेखील असतो. महाराजांनी सोनतळी कॅम्पवर एका खुनशी पिल्याला पाळले होते.आजतागायत तरी अशा चित्त्याला कोणी पाळले नव्हते, परंतु महाराजांनी है अशीत करून दाखविले होते. तसेच महाराजांजवळ आफ्रिकन पित्याची एक मादीसुद्धा होती. या मादीला बालपणापासून महाराजांनी ला लावला होता. ही बंधमुक्त मादी महाराज कॅम्पवर आले की त्यांच्या अवतीभोवतीच सतत वावरत असे. हरणांच्या कळपातील फक्त काळविटाचीच शिकार करण्याची कला महाराजांनी तिला शिकविली होती. आफ्रिकन चित्ता व चित्तीण महाराजांनी पाळली आहे, ही खबर इतर संस्थानिकांनाच नव्हेतर ब्रिटिशांनादेखील खरी वाटत नसे. चित्तीण तर बंधमुक्त असते, यावरदेखील कोणी विश्वास ठेवीत नसत.. महाराजांच्याजवळ देशोदेशींचे अनेक चित्ते होते. महाराजांजवळ एक नागपुरी चित्ता व माजात आलेली वरी, चित्तीण होती. आफ्रिकन चित्ता-चित्तीण एकत्र आणण्यापेक्षा नागपुरती चित्ता आणि आफ्रिकन चित्तीण यांच्यात संकरित जात निर्माण करावी म्हणून महाराजांनी या दोघांना रायबागच्या जंगलात सोडून दिले.

चित्ता आणि चित्तेवान

 दोघांची जोडी जमली. दिवसभर ते जंगलात भक्ष्य शोधण्यासाठी इतस्ततः एकत्र फिरत व रात्र होताच परतत. महाराजांनी रायबागच्या ज्या शिकारखान्यात त्यांना ठेवले होते, तिथे ते परत येत व परत पहाटेच्यावेळी ते जंगलात जात. असेच काही दिवस निघून गेल्यावर त्या उभयतांच्यात रानटीपणा वाढला. आता माणूस दिसला की ते दूर दूर पळू लागले. एक दिवस काय झाले कोणास ठाऊक त्या चितणीने व चित्त्याने एकाएकी जंगल सोडून दिले व पूर्वी महाराजांनी त्या चित्तीणीला वा शिकारीनिमित्त ज्या ज्या शिकारतळांवरून फिरविले होते, तिथे तिथे ते उभयता जाऊन पोहोचले. चित्तीणीला महाराजांचा अधिक लळा असल्यामुळे तिने पुढे होऊन शिकरतळांचा कानाकोपरा पालथा घातला. तिथे तिला कोठेही महाराज दिसले नाहीत ती नाराज झाली. कोणत्याच शिकारतळावर महाराज नाहीत. म्हटल्यावर ते दोघे भिर्डीला आले. तिथेही महाराज नव्हते. तिथून पुढे सौंदत्ती, जुंगूळ, शेडबाळरून ते दोघे दानवाडला आले. तिथेही महाराज नाहीत है। कळल्यावर पंचगंगा नदी पार करून हुपरी, रेंदाळ पार्कात आले. नंतर सरळ कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील कागल नाक्याजवळ आले. चित्तीण तर पुढे पुढे सारखी धावतच होती.


चित्तेवान इस्माईल रेहमान


पाठीमागून तो नर येत होता. कागलजवळ आल्यावर चित्तीणीच्या लक्षात आले की, चित्ता आपल्यासोबत नाही. त्या चित्त्याला शोधण्यासाठी ती टेकडीवर चढली. टेळहणी करू लागली. तिला तो चित्ता कोठेच दिसला नाही. त्याचा नाद तिने सोडला व धावतच ती महाराजांच्या कोल्हापुरातील स्टेशन बंगल्याच्या आवारात आली. तिथे असणारी माणसांची वर्दळ पाहून ती परत माघारी परतली ती सरळ महाराजांच्या बावडे बंगल्यावर आली. सुदैवाने महाराज यावेळी बंगल्यात होते. चित्तीण आल्याची खबर मिळताच महाराज धावतच बाहेर आले. महाराजांना पाहताच ती चित्तीण आनंदाने जागेवरच जोराजोरात हालचाल करू लागली. एकदम काय त्या चित्तीणीच्या मनात आले कोणास ठाऊक. महाराजांविरुद्ध बाजूला तोंड करून ती उभी राहिली. महाराजांनी ओळखले, ही आपल्यावर खूप रागावलेली आहे. महाराज तिच्याजवळ गेले, त्याबरोबर महाराजांना एकही नख न लागू देता तिने खूप चापट्या मारल्या. महाराजांना अक्षरशः इकडून तिकडे घोळसविले. महाराज म्हणाले, "बाई, माझं चुकलं. मी परत तुला जंगलात पाठविणार नाही." असे म्हणताच चित्तीण एकदम शांत झाली. तिला भूकसुद्धा लागली होती... महाराजांनी स्वतःच्या हातांनी तिला पोटभर खावयास घातले. पुढे काही दिवसांनी तो चित्ता परत सापडला. ही हकिकत महाराजांनी कर्नल वूडहाऊस यांना १९ डिसेंबर १९१९ रोजी पाठविली होती.

करवीर सौंस्थानातले 35 चित्ते



Sunday, September 11, 2022

गणेशोत्सव मंडळ संस्कृतीक का विकृतीक?

 

                       तारीख होती 14 सप्टेंबर 1893, पुण्याचा विंचूरकर वाड्यातून बाप्पाच्या आरत्यांचे आवाज आता चौकापर्यंत घुमू लागले 1857 च्या उठावा नंतर जी स्वातंत्र्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात जागी झाली होती तीच या आरत्यांच्या मागे घंटी सारखी वाजत होती . इंग्रजांच्या फुटीच्या राजकारणा मुळे भारतीय संस्कृती चा लोप होत होता अश्या स्थिती मध्ये एका संघटित शक्ति ची गरज होती जी या संपत चाललेल्या संस्कृती ला पुनः जागृत करेल; 

लोकमान्य टिळकांचं सार्वजनिक गणेश मंडळ




             हेच मूळ उद्धिष्ट ठेवून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला एक सार्वजनिक रूप प्रधान केले ,परंतु वादाचा प्रसंग हा आहे की याच्या आधी च भाऊसाहेब रंगारी नी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट ची स्थापना केली होती असे सांगितले जाते पण या दोन्ही घटनांचा विचार करता मूळ उद्देश मात्र एक च समोर येतो तो म्हणजे संस्कृती आणि धर्मचा होणारा ऱ्हास थांबवणे . "जी युवाशक्ती आपल्या संस्कृती बद्दल आपल्या धर्मच्या महानते बद्दल विसरत चालली आहे आणि इंग्रजांच्या जाळ्यात अडकून आपल्याच धर्माचे आणि आणि माती ची शत्रू बनत चालली आहे अश्या प्रत्येक युवकाला जागृती प्रधान करून हा गणेशोत्सव स्वतंत्र भारत चवळीच्या श्रीगणेशा ठरेल " केसरी मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखातून टिळकांनी देशातील युवकांना संबोधित करत असे वकत्व लिहले होते


                सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा इतिहास बघता हे स्पष्ट होते की काळानुसार गणेशोत्सवाच्या स्वरूपात कमालीचा फरक पडला आहे जो उत्सव संस्कृती च्या संरक्षणासाठी सुरु केला होता त्यात आज सांस्कृतिक भाग किती शिल्लक राहिला आहे हे पुन्हा एकदा परखण्याची गरज आहे . सांस्कृतिक धार्मिक एकतेच्या जागी आता कुठे तरी परस्पर ईर्षेचा एक मुखवटा प्रत्येक गणेशोत्सव मंडळावर चढेलला दिसून येतो ,टिळकांनी किंवा त्या काळातील लोकांनी ज्या एका गणेशोत्सवाची कल्पना केली होती ती आता केवळ स्वप्नवत किंवा परिकल्पना बनली आहे  मग ते मूर्ती आणण्याच्या तारखांचे वाद असोत किंवा विसर्जनावर होणारी बाचाबाची, स्थानिक पातळीवर सरकारने विसर्जनावावर काही प्रतिबंध आरोपीत केले आहेत हे आपण या वर्षीही पाहू शकतो ,नदी ,तलावा सारख्या नैसर्गिक स्रोतांचे होणारे नुकसान हे त्या मागचं कारण आहे असं प्रशासनाकडून प्रत्येक वेळी सांगितलं जातं , परंतु काही गणेशोत्सव मंडळ तसेच धार्मिक संघटनांना अस वाटत की हा प्रतिबंध आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर घातलेला घाव आहे पण यामागे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की कोणताही हिंदू सण हा निसर्गाशी ताळमेळ प्रस्थापित करूनच निर्मित केला आहे आणि तो आजचा नाही हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. 

प्लास्टर मूर्ती चे विसर्जनानंतर चे हाल

        पण मग प्रदूषणाचा विषय येतो कुठे? ही गोष्ट प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने समजून घेण्यासारखी आहे की मूळ सांस्कृतित गणपती च्या एका माती किंवा शाडुपासून बनवलेल्या प्रतिमेची प्रतिष्ठापना आणि विसर्जन करण्याचा प्रघात आहे. पण आपण आपल्या सोईनुसार आपण त्याचे रूपांतर पीओपी मध्ये केले कारण शाडूच्या मूर्तीचे वजन आणि उंची ही आपल्या वाढत्या महत्वकांक्षा आणि इर्षेला बाधक ठरत होती . शाडू च्या मूर्ती विसर्जनामुळे नदीच्या शेजारील शेतीना तसेच झाडांना माती मिळत होती ,तलावातील जलजीवन विस्कळीत होत न्हवते. पण पीओपी च्या वापररामुळे पाण्याचे स्वरूप आम्लधर्मी म्हणजे ऍसिडीक होते पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊन जलजीवन संपुष्टात येते एकूणच काय आपल्या स्वार्थापोटी आपण संस्कृती बरोबर प्रकृतीचा ही नाश करत आहोत !

शाडू मूर्ती पूर्ण विघटन

            The hindu मध्ये प्रकाशित वृतां नुसार अखंड महाराष्ट्रात 2022 च्या गणेशोत्सवा दरम्यान 37 युवकांनी आपले प्राण गमवले यातल्या 20 जणांना विसर्जनावेळी पाण्यात अडुकन तर बाकीच्या 17 जणांना दोन गणेशोत्सव मंडळात झालेल्या वादवादीमध्ये आपले प्राण गमवावे लागले. 

हजारो वर्षे झाले, अनेक राजे आले अनेक राज्य अस्तित्वात आलीत आणि मातीमोल झालीत पण मागे राहिली ती संस्कृती मागे राहिला तो धर्म आपल्या एकतेचे कारण आणि गौरवाचे प्रतीक! आणि आज आपण आपल्या संस्कृतीचा आपल्या गौरवाचा ऱ्हास स्वतः करत आहोत का ? गणेशोत्सव नेहमीच आपल्याला आपल्या धर्माच्या प्राचीनतेची जाणीव करून देतो मग तो अफगाणिस्तानात सापडलेला 2500 वर्षापूर्वीचा काबुल गणेश असो किंवा कंबोडिया साऊथ आफ्रिका मध्ये साजरा होणारा गणेशोत्सव , युगानुयुगे विश्वव्यापी संस्कृती ही सनातनच होती याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कोणतीही घटना ही धडाक्याशिवाय घडली नाही तर मानवी लक्ष तिकडे केंद्रित होत नाही ही मानवी मनोवृत्ती आहे आज अफगाणिस्तान ,पाकिस्तान सारख्या देशात मंदिरे हिंदू देवी देवतांच्या मुर्त्या कश्या उध्वस्त केल्या जात आहेत याचे वृत्त आपण वाचतो आणि हळहळ व्यक्त करतो , पण आपण कधी ही सांस्कृतित आपल्या सोयीनुसार परिवर्तन करत आहोत हे मान्य करत नाही.. मग तो धर्मचा ऱ्हास नाही का ? आजकाल किती तरी गणेश मंडळे चतुर्थी च्या आधीच बाप्पाचे आगमन करताता आणि अनन्त चतुर्दशीनंतर दुसर्या किंवा तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते ज्याच्या मागचा उद्देश केवळ आपली वयक्तिक छाप सोडणे, काही तरी वेगळे करून लक्षवेधने किंवा आमचा बाप्पा दुसर्यापेक्षा वेगळा आहे आणि त्यामुळे तो दुसऱ्यांबरोबर विसर्जनात सहभागी करणार नाही असा मूर्ख अट्टाहास असतो. संस्कृती च्या नावाखाली आपल्या मंडळाच्या वयक्तिक महत्वकांक्षा ही अशी मंडळे पूर्ण करतात ज्या उत्सवाची सुरवात च धर्माच्या एकतेसाठी झालीं होती तोच आज आपण आपल्या आपल्यातल्या वादाचे निम्मित म्हणून वापरतो प्रत्येक गल्लीत 4-5 मंडळे ही सर्रास बघायला मिळतात आणि अनेकवेळा असंच दिसून येत की प्रत्येक मंडळाचा उदय हा एका मंडळापासून फुटून किंवा दोन गटांमधील वादामुळे झालेला असतो. 


मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे ,बायका आणून नाचवणे मोठमोठे डॉल्बी लावून शक्तिप्रदर्शन करणे या गोष्टी मुळे मूळ उत्सवाची संकल्पना संपुष्टात आली आहे .बुद्धी दाता म्हणवल्या जाणाऱ्या गणपतीची खरी पूजा म्हणजे स्वतःच्या बुद्धी चा विकास होय. ज्या ताकतीने ज्या इर्षेने आपल्याच गल्लीतल्या दुसऱ्या मंडळाबरोबर आपण वाद घालतो त्याच शक्तीने आपण आपल्या देशासाठी का लढू शकत नाही?? शहरातल्या रस्त्यावर मिरवणुकी काढून मंडळाचा झेंडा अंगावर लपेटून आपल्याला  धन्यतेची जाणीव होते , अस वाटत की जग जिंकलं !! ........पण देशा साठी लढून जेंव्हा त्याच शहराच्या रस्त्यावरून आपले शरीर तिरंग्यात लपेटून जाते ती असते खरी धन्यता, जो धर्म महाराजांनी आपल्याला शिकवला जी ताकत सह्याद्रिने आपल्याला दिली त्याचे प्रदर्शन दूर हिमालयाच्या कड्यावर उभा राहून करणे म्हणजे खरा पुरुषार्थ.! एखादया मुली बरोबर रिलेशन मग तिला घेऊन गणपती फिरणे , मंडळच्या पूजा अटेंड करणे म्हणजे असतो का खरा पुरुषार्थ ? आपला धर्म सांगतो या पृथ्वी वर लाखो जीवजन्तु जनावर अस्तित्वात आहेत प्रत्येकजण जन्म घेतो , सम्भोग करतो ,प्रजनन करतो आणि मरून जातो पण तुम्ही माणूस आहात त्यांच्या पेक्ष्या वेगळे आहात मग तुम्ही वेगळं अस काय केलं त्यांच्या पेक्षा???  उलट त्यांच्यापेक्षा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जास्त अटापीटा तुम्हाला करावा लागतो हे आपलं दुर्भाग्य !!  कटू आहे पण सत्य आहे

संकल्पना : अपूर्व शेळके