हिरव्या हिरव्या साडीचा आहेर घेऊन येणारा पाऊस काळ्या सह्याद्री ची ओटी जेंव्हा जलधारांच्या वर्षावाने भरतो तेंव्हा त्याचे रोम रोम पावन होऊन परमार्थाला प्राप्त होते. सह्याद्री. श्री रामा पासून छत्रपतीं पर्यंत अनेक ऐतिहासिक घटनाचा प्रत्यक्ष साक्षीदार किल्ल्यांचा प्रत्येक दगड ,सह्याद्रीचा प्रत्येक दगड महाराजांची अमर गाथा अजून सांगतो पण फक्त ऐकायला कान पाहिजेत. याच सहयाद्रीचा आवाज ऐकायला आम्ही ही निघालो पन्हाळा पावन खिंड पदभ्रमंती ला ...........
छत्रपतींचा जयघोष करत पन्हाळा उतरताना खरच त्यांनी खाल्लेल्या खस्थांची आठवण होते आणि डोळ्यातून आपसूकच पाणी येते खाली बघताच पन्हाळ्याच्या भव्यतेची आणि सिद्धी च्या वेढ्या ची आठवण होते, कुट्ट अंधार खवळलेला वरून राजा आणि पालखी घेऊन खाली उतरणारी काही
पाऊलं,पायाखाली पाचोळा चुरचुरत होता "पृथ्वी वर अवतरलेला परमात्मा हाच वाटत" लांब झाडावर बसलेलं घुबड मोठ्या डोळ्यांनी प्रत्येक क्षण टिपत होत,त्या रात्री अंधार ही जास्तच होता कदाचित महाराजांच्या रक्षणासाठी परमात्मा पण तत्पर होता. हे सगळं आठवलं की दमलेल्या पायात अचानक बळ येत आणि चालायला लागतात. किती महान होते ना ते लोक देशा साठी धर्मा साठी प्राण पण फुला सारखे उधळले .पण इतिहास मुक्का आहे तो काहीच सांगत नाही म्हणून निवडक सोडले तर इतक्या मौल्यवान रत्नांची नाव सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. पण या सह्याद्रीला सगळं आठवत अगदी कालच घडल्या सारख पण त्याच ऐकायला कोणी येत नाही आजकाल .
पन्हाळा उतरून मसाई पठारावर जाताना उंच उंच दगड हळूच विचारतात "बाबांनो पायात बळ आणि मनात छ्त्रपती असतील तरच पुढं पाऊल टाका नाहीतर पठारची मसाई तुम्हाला वर घ्यायची नाही अनेक मुघलांचा कडेलोट केलाय तिनं"पठारावर गेल्यावर निसर्गाच्या सुंदरतेची जाणीव होते . तिथं मसाई च एक छोटंसं मंदिर ही आहे इथली ग्राम देवता म्हणून ही ती ओळखली जाते .
पठारावरून उतरण्यासाठी पायवाट आहे, जाताना चॉकलेट ठेवा थोडे बरोबर आदिवासी वस्तीची मुले ही भेटतात वाटेत त्यांना दिले तर त्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहण्यासारखा असतो खाली उतरुन काही तरी खाऊन पुढच्या प्रवासाला निघालेलं बरं कारण पुढचा प्रवास जरा अवघड आहे.
उचं निर्गीली वन आता चालू होत मोठं मोठी निर्गीली त्यांचा येणारा तो मादक वास पाहता पाहता आता सूर्य उतरतीला लागला असतो.धुक्याची चादर पांघरून हे वन सुद्धा झोपायची तयारी करत त्याच्या आधीच तिथून बाहेर पडलेले बरं नाही तर तिथेच हरवाल.
वणानंतर येती ती छोटीशी वस्ती आंबेवाडी 400 500 माणसंच छोटस गाव जास्त करून इथले तरून शहराकडे गेले ते परतलेच नाहीत, त्यांचीच वाट बघत शेवटचे दिवस मोजणारे काही चेहरे मी पाहिले या गावात. जंगलात हरवलेला सापडेल पण शहरात हरवलेला सापडणं अवघड असत. पण काही ही म्हणा एवढं चालून जे दोन भाजी भाकरीचे घास जे पोटात जातात ना त्या पुढे मग पंच पक्वान्न पण फिक वाटत ,आणि झोप ती तर स्वर्ग सुख च असते दुसऱ्या दिवशी लवकर उठून चालायला लागायचं कारण अजून खूप डोंगर आपली वाट पाहत असतात पुढे. दुपार पर्यंत चालून शेवटी पोहोचतो आपण पावनखिंडीत ......
पावन खिंड बाजीप्रभुंच्या शौर्याने पावन झालेली जागा. तिथं गेलं ना प्रत्येक दगडाला मिठी मारावीशी वाटते सांगावस वाटत की स्वराज्यासाठी सांडलेल्या त्या रक्ताने तुला अमर केलं रे काही गोष्टी अश्या असतात ज्या शब्दात कधीच व्यक्त होत नाहीत तसच आहे हे नातं पण.नुसतं बघितलं तर दगडं आहेत पण जरा थांबा शांत व्हा मग बघा वेदनेला विरता बनवण्याचा मूलमंत्र शिकवतील ते फक्त समजायला तुम्ही सुजाण हवेत.
छत्रपतींचा जयघोष करत पन्हाळा उतरताना खरच त्यांनी खाल्लेल्या खस्थांची आठवण होते आणि डोळ्यातून आपसूकच पाणी येते खाली बघताच पन्हाळ्याच्या भव्यतेची आणि सिद्धी च्या वेढ्या ची आठवण होते, कुट्ट अंधार खवळलेला वरून राजा आणि पालखी घेऊन खाली उतरणारी काही
पन्हाळा उतरून मसाई पठारावर जाताना उंच उंच दगड हळूच विचारतात "बाबांनो पायात बळ आणि मनात छ्त्रपती असतील तरच पुढं पाऊल टाका नाहीतर पठारची मसाई तुम्हाला वर घ्यायची नाही अनेक मुघलांचा कडेलोट केलाय तिनं"पठारावर गेल्यावर निसर्गाच्या सुंदरतेची जाणीव होते . तिथं मसाई च एक छोटंसं मंदिर ही आहे इथली ग्राम देवता म्हणून ही ती ओळखली जाते .
पावन खिंड बाजीप्रभुंच्या शौर्याने पावन झालेली जागा. तिथं गेलं ना प्रत्येक दगडाला मिठी मारावीशी वाटते सांगावस वाटत की स्वराज्यासाठी सांडलेल्या त्या रक्ताने तुला अमर केलं रे काही गोष्टी अश्या असतात ज्या शब्दात कधीच व्यक्त होत नाहीत तसच आहे हे नातं पण.नुसतं बघितलं तर दगडं आहेत पण जरा थांबा शांत व्हा मग बघा वेदनेला विरता बनवण्याचा मूलमंत्र शिकवतील ते फक्त समजायला तुम्ही सुजाण हवेत.

good. keep it up
ReplyDeletegood. keep it up
ReplyDeleteGreat bro, the writing keeps the reader engaging.
ReplyDeleteThank you bro
DeleteKhup khup sundar.. Keep it up. Shabd rachana ekdum surekh.
ReplyDelete