फक्त लढ म्हणा कविता
खूप वेळा ऐकली
होती . सुरेख काव्य लेखन सुंदर वाक्य रचना .पण वाटलं न्हवत
की ती कधी प्रत्यक्षात
पण अनुभवायला मिळेल.
पण ऊन सावलीच्या श्रावणाची सावली इतकी गडद असेल असे कदाचीतच कोणाला वाटले असेल श्रावण महिन्यातला तो पहिला शुक्रवार होता साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापुरात तो मोठ्या आनंदानं साजरा होत होता; भरजरी वस्त्र आणि मोठं मोठे अलंकार घालून जगदंबा सजली होती. धुपदीप आरत्या चालल्या होत्या. पण का कुणास ठाऊक जगदंबेच्या चेहऱ्यावर एक आकस्मित शांतता पसरली होती कोना थोर भक्तालाच ती उमगली असावी. शुद्ध अंतकरणाने दगड जरी पुजला तरी त्यात परमात्मा आवतरतो असे म्हणतात बाकी काय सर्व मिथ्या आहे.किती वेळ झाला पण आज सूर्य दर्शन झालेच न्हवते पावसाची संततधार सुरूच होती असेल कदाचित प्रत्येक जण आप आपल्या कामात मग्न होता.शुक्रवार गेला शनिवार गेला रविवार गेला पण पाऊस काय कमी येत न्हवता. आता मात्र वाढणारा पाऊस चिंतेच कारण बनत चालला होता. नागपंचमीची ती रात्र होती नागासारखी वळण घेणारी पंचगंगा आता अजगरासारखी कोल्हापूरला गिळत चालली होती कोल्हापूरला मात्र याचा आभास ही न्हवता ते शांत निजले होते.
दुसरा दिवस उजाडला पाहतो तो काय पंचगंगा आता उंबरठ्यावर येऊन टेकली होती.काळीज धस्स करणारी जाणीव आता मनात होऊ लागली. इकडं पुलावर मात्र लोकांची पूर पाहण्यासाठी गर्दी होत होती पाण्याचा खळखळनारा आवाज दुरून वाहून येणारी मोठं मोठी झाडं पाण्याची ताकत स्पष्ट करत होतीत.राधानगरी धरणाचे दरवाजे आता हळूहळू उघडू लागले होते शत्रूच्या भात्यातून सुटलेला बाण जसा छातीवर येऊन धडकावा तसा पाण्याचा प्रत्येक लोंढा कोल्हापूर वर येऊन धडकत होता.
हुंबर्यावरच पाणी आता आत आलं होतं, घोटा गुढगा करत आता कंबरेपर्यंत चढलं होत . पुराचा महापूर झाला होता हे प्रत्येकाला कळून चुकलं होत. माणसांनी दुसऱ्या मजल्यावर,पत्र्यावर आश्रय घायला सुरवात केली होती मातीची घरे आता ढळू लागली होती,पण पडणारी नुसती घरे न्हवती भावना होत्या आयुष्य होत संसार होते लोकांचे . उंच उंच वाडे पत्त्याच्या महालासारखे पडत होते कधी न पाहिलेला दिवस आज कोल्हापूरसाठी उजाडला होता.ही तपोभूमी होती उत्तर काशी नंतर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर आता स्वतःच्या मुक्तीची प्रार्थना करत होते. बघता बघता महापुराचा विळखा घट्ट बसला होता,हजारो एक्कर शेती पाण्याखाली गेली होती कोल्हापूरात प्रवेश करण्याचे एकमेव द्वार महापुरामुळे बंद झाले होते . वर पाहावे तर आकाश दिसत नाही खाली पाहावे तर जमीन दिसत नाही अश्या दयनीय अवस्थेतून जात होता प्रत्येक जण. जन्माला येऊन एकतरी कोल्हापूरी माणूस जोडावा म्हणतात मदतीची वक्त न बघता प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला धावत होता. महादेवाच्या मदतीला महोम्मद धावला ,मेरीच बाळ आज मिराच्या कुशीत खेळत होत खरच आज जातीत हरवलेला माणूस सापडला होता .वाट अडचणींची होती पण अडचणींना पण सांगा की वारसा संघर्षाचा होता .
प्रत्येक स्तरातून मदत येऊ लागली होती. कपडे ,धान्य,डाळी यांच्या
राशी उभा राहू लागल्या पण पूरग्रस्तांना खरी
गरज होती ती आधाराची मायेची आयुष्य
खर्ची पडत माणसाला संसार उभा करायला आणि तो जेंव्हा तुटतो
तेंव्हा येणाऱ्या संकटाची कल्पना तुम्ही करू पण शकत नाही.
धीर देणार्याला पण कोल्हापूर कोल्हापूरकर
कुठं माग पडत नाहीत. प्रत्येक जण उद्याची आस
लावत होता आता खळखळनाऱ्या पाण्याचा आवाज आता प्रत्येकाच्या मनातील जोश ताकत अजून वाढवत होता.आता मात्र परमेश्वराला सुद्धा हात टेकायला लागले पाच सहा दिवसानंतर सूर्याचा एक किरण आत
प्रवेशला. तो एक आशा
घेऊन आला आशा त्या प्रत्येक बाळाच्या चेहऱ्यावर विखुरण्यासाठी आला ज्याचं नवं नवं जग आज उध्वस्त
झालं होतं.आशा त्या प्रत्येक तरुणांच्या हृदयात भरण्यासाठी आला त्याच तारुण्य कदाचित माहापुरात वाहून गेल होत. हे सारं बघून
प्रत्येकाच्या डोळ्यातून निघणारे आश्रू कित्येक दिवस चाललेल्या जीवन मरणाच्या संघर्षाच प्रमाण देत होते. प्रत्येकानं केलेल्या संघर्षाची गाथा आता सूर्यनारायण आपल्या तेजोनिशी गाऊ लागला.पूर आता ओसरत होता पण संघर्ष अजून
संपला न्हवता आयुष्याची सुरवात आता नव्यानं करायची होती शून्यातून विश्व उभं करायचं होतं. काही झालंच नाही असं समजून प्रत्येक जण आता कामाला
लागला महापूर सर्व काही घेऊन गेला घर दार ,गाई
गुरे माणुसकी मात्र मागे ठेवली प्रत्येक धर्माने आपला रंग निवडला पण रंगाचा मात्र
कोणता धर्म नसतो. प्रत्येक धर्म प्रेम आणि माणुसकीच शिकवतो. आणि माणुसकी पेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आज महापुराने शिकवलं......
!




Khup khup sundar likhan, ajun hi tya athwani angawar kata ubha kartat. Hya lekhachi takad pan tashich. Wachtana angawar kata ubha rahila. Khup uttam shabdrachana.
ReplyDeleteAbhari ahe
ReplyDeletejiklays..
ReplyDeletekuth hota he talent..
very nice
jiklays..
ReplyDeletekuth hota he talent..
very nice
Bhava kadakk ha paristhiti athavali gelya varshichi
ReplyDeleteVery nice
ReplyDelete