तो 1900 चा काळ होता , कोल्हापुरातील खूप युवा संख्या ही दारू सिगारेट सारख्या व्यसनाच्या आधीन झाली होती.बेरोजगरीमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली होती ,राजाराम महाराजांना या वर उपाय शोधायचा होता, आणि तो उपाय घेऊन आले ते प्रिन्स शिवाजी. प्रिन्स शिवाजी हे विदेशात उच्च शिक्षण घेत होते, त्यांनी तिथे फुटबॉल हा खेळ बघितला होता आणि हा खेळ तसा रांगडा आपल्या कोल्हापूरकरांसारखा आणि हा खेळ मायदेशी नेण्याची त्यांची इच्छा होती.1914 साली प्रिन्स शिवाजी आपलं शिक्षण पूर्ण करून भारतात आले .त्या काळात नारायण सिंघ कोल्हापुरात फुटबॉल खेळायचे,त्यांच्या मदतीने प्रिन्स शिवाजींनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली,आणि इ.स. 1916-17 च्या दरम्यान कोल्हापुरात फुटबॉल खऱ्या अर्थाने सुरू झाला.
1918 साली प्रिन्स शिवाजींचे अपघाती निधन झाले.त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापुरातील फुटबॉल चा स्थर उंचावण्याची जवाबदारी घेतली.त्यांनी नवीन संघाची स्थापना केली ज्याला 'भवानी पॅलेस संघ' असे नाव देण्यात आले. कालांतरने ते बदलून संघाचं नाव ' जय भवानी ' केले गेले,कुलदेवी भवानी असल्यामुळे ठेवण्यात आले,जे संघ राजाराम महाराजांच्या मालकीचे होते त्या सर्व संघांचे नाव हे जय भवानी ठेवण्यात यायचे.
आता फुटबॉल हळूहळू कोल्हापूरात रुजू लागला होता, वेगवेगळे संघ तयार होऊ लागले होते.देवास चे युवराज विक्रम पवार जेव्हा कोल्हापुरात शिक्षणासाठी आले होते,राजाराम कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी ' देवास युवराज क्लब ' हा संघ काढला,त्याच बरोबर राजाराम महाविद्यालयांचा अधिकृत संघ होय ज्याला ' राजाराम11 ' म्हणून ही ओळखलं जातं होत. आता हळूहळू फुटबॉल कोल्हापुरातल्या पेठांमधून पसरू लागला होता . त्या काळी बॉल ची निर्मिती तशी कमीच असायची,त्यामुळे लगद्याचे गोळे आणि रबर वापरून तयार केलेले बॉल फुटबॉलची कमतरता भरून काढत होते. स्टेडियम उपलब्ध नसल्याने मोकळ्या रानात, माळावर हा खेळ खेळू जाऊ लागला.
आता फुटबॉल हळूहळू कोल्हापूरात रुजू लागला होता, वेगवेगळे संघ तयार होऊ लागले होते.देवास चे युवराज विक्रम पवार जेव्हा कोल्हापुरात शिक्षणासाठी आले होते,राजाराम कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी ' देवास युवराज क्लब ' हा संघ काढला,त्याच बरोबर राजाराम महाविद्यालयांचा अधिकृत संघ होय ज्याला ' राजाराम11 ' म्हणून ही ओळखलं जातं होत. आता हळूहळू फुटबॉल कोल्हापुरातल्या पेठांमधून पसरू लागला होता . त्या काळी बॉल ची निर्मिती तशी कमीच असायची,त्यामुळे लगद्याचे गोळे आणि रबर वापरून तयार केलेले बॉल फुटबॉलची कमतरता भरून काढत होते. स्टेडियम उपलब्ध नसल्याने मोकळ्या रानात, माळावर हा खेळ खेळू जाऊ लागला.
श्री.शिवाजी तरुण मंडळ वि. महाकाली भजनी मंडळ सामन्यातील एक क्षण
वविश्वायुद्ध 1 चे सेवानिवृत्त अधिकारी गणपतराव भोसले , श्रीपतराव साळोखे उर्फ तात्या जामदार यांनी राजाराम माध्यमिक शाळेचे शिक्षक मालकासिंग यांना घेऊन झुंजार क्लब ची स्थापना केली. ज्याची प्रॅक्टिस ही पंचगंगा घाटावर असणाऱ्या शंकराचार्य मठाच्या प्रांगणात होत असे. 1922 साली त्यांनी राजाराम माध्यमिक शाळेच्या मुलांच्या संघाची स्थापना केली त्या टीम च नेतृत्व बाबलाल बागवान यांनी केलं आणि त्या टीम च नाव प्रॅक्टिस क्लब ठेवण्यात आलं अश्या प्रकारे झुंजार क्लब आणि प्रॅक्टिस क्लब असे दोन संघ उदयास आले.
त्यानंतर शिवाजी तरुण मंडळ 1932 ला , बालगोपाल तालीम मंडळ 1946 ला ,दिलबहार तालीम मंडळ 1955 ला , पाटाकडील तालीम मंडळ, 1960 ला ,शाहूपुरी 1966 ला ,खंडोबा तालीम मंडळ 1991 ला , संध्यामठ 1990 ला तर अनिल मंडलिक स्पोर्टइंग 1994 ला उदयास आले. त्यापाठोपाठ बळीराम तालीम,मेनॉन, KMC, बागल चौक तरुण मंडळ, गडहिंग्लज फुटबॉल संघ, दक्षिण सातारा पोलीस( सांगली पोलीस),पोलंड संघ(गडहिंग्लज पोलीस), मिरज वैद्यकीय महाविद्यालय, आरवाडे बंधू (सांगली), गांधी चौक मिरज असे संघ तयार झाले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर देवास चे युवराज हे विक्रम पवार हे छ.शाहजी म्हणून छत्रपती झाले आणि त्यांनी 8 एप्रिल 1940 साली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) ची स्थापना केली.छत्रपती शहाजी महाराजांनी 1947 - 1983 अशी सलग 36 वर्ष KSA च पेट्रन पद सांभाळ. त्या काळात शाहजी राजांनी छ.शाहू स्टेडियम आणि पोलो ग्राउंड अशी मैदान संघांना मिळवून दिली.या स्टेडियम मुळे कोल्हापूरची दारं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेनसाठी खुली झाली होती. ONGC (Oil And Natural Gas Corporation) ही राज्यस्तरीय स्पर्धा कोल्हापुरात भरवली गेली. भारत विरुद्ध हॉलंड ही मैत्रीपूर्ण महिला फुटबॉल सामना हा कोल्हापूरकरांनी अनुभवला.
श्री.शिवाजी तरुण मंडळ संघ
जसजसे दिवस बदलू लागले तसतसे खेळाडू आणि संघ दोन्ही वाढू लागले .कोल्हापूरचे छत्रपती, जत किंग, सांगलीकर पटवर्धन, या काही राजवंशीय संघांनी फुटबॉल कोल्हापूरच्या छोट्या छोट्या गावात पसरवला.
कोल्हापूरात शालेय वया पासून फुटबॉल ची आवड निर्माण करायला आणि खेळाडू निर्माण करायला शालेय संघ जसे सिटी क्लब,जॉली क्लब, फ्रँडझ क्लब,न्यू हायस्कूल ,मराठा बोर्डिंग, शिवाजी क्लब,बालविर,लायन,टायगर,ईगल क्लब यांनी मोलाचे सहकार्य केले .
कोल्हापूरात शालेय वया पासून फुटबॉल ची आवड निर्माण करायला आणि खेळाडू निर्माण करायला शालेय संघ जसे सिटी क्लब,जॉली क्लब, फ्रँडझ क्लब,न्यू हायस्कूल ,मराठा बोर्डिंग, शिवाजी क्लब,बालविर,लायन,टायगर,ईगल क्लब यांनी मोलाचे सहकार्य केले .
जसे संघ मोठे होते तश्या स्पर्धा आणि चषक ही मोठे होते त्यातले काही चासकांमध्ये मग येतात दाभोळकर चषक (कनिष्ठ गट) ,केळवकर चषक (वरिष्ठ गट) , छ्त्रपती शाहू सुवर्ण चषक ,1960 पासून सुरू झालेले दसरा चषक,अन्वर चषक, दामू अण्णा मालवणकर चषक कोल्हापुरात खेळवले गेले, काही दिवसांनी दाभोळकर चषक आणि केळवकर चषक हे KSA 'A' आणि 'B' असे भाग पाडण्यात आले .रोमांचक आणि आकर्षक अशे पुढारी चषक (PFL), महासंग्राम चषक, मुस्लिम बोर्डिंग चषक , अस्मिता चषक ,नेताजी चषक, तर शालेय संघांसाठी KUFA चषक हे खेळले जायचे. तर ' वेटरण 'चषक हे वृद्ध आणि निवृत्त खेळाडूंसाठी खेळवले जायचे. 1985 साली दिलबहार तालीम मंडळाने प्रथमच रात्रीच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या ज्यांना आपण आताच्या भाषेत Night Matches असे म्हणतो. आणि त्याला छत्रपती राजश्री शाहू चषक नाव देण्यात आले.
आज कोल्हापूर फुटबॉल विश्वाचा विस्तार हा प्रचंड झाला आहे, आणि त्यांचे विभाजन A,B,C,D,E अश्या तुकड्यात करण्यात आले आहे . आणि ग्रामीण विभागाचे विभाजन त्यांच्या खेल कौशल्यावर केले गेले आहे.



No comments:
Post a Comment