महाराष्ट्र हे खूप विविधतेने नटलेले राज्य आहे , राज्य भाषा मराठी असली तरी त्याचे ही चढउतार खूप आहेत ती वाळवावी तशी वळते अगदी नागमोडी सरखी. असे म्हणतात की पाण्याची चवीनुसार मराठी चा उच्चारही बदलत जातो मग ते पुण्याच्या पेशवाई मराठी पासून ते मुंबईच्या गोंगळ्या मराठी पर्यंत.
महाराष्ट्रच्या जसजसे दक्षिणेकडे जावे तशी ती तिखट होत जाते दक्षिण टोक अर्थात कोल्हापुरात ती एक रांगड रूप धारण करते इथल्या माती सारखी; पैलवानकीचा माज ,तांबड्या पांढऱ्या रस्याची चटक घेऊन ती अतिशय रांगड्या पद्धत्तीने ती इथे सर्रास बोलली जाते ,'आलतो-गेलतो' असे पुरलिंगी शब्द इथल्या मुलीसुद्धा सर्रास बोलतात . शिवी शिवाय पाणी न गिळणारी इथली आज्जी आपल्या नातवाला ,नातीला दरडावताना एकेरी नावाचा उल्लेख निवांत करते ,पण रांगड्या वाटणाऱ्या या भाषेत इथल्या ऊसाचा गोडवा ही खूप भरलेला आहे माया प्रेम अश्या भावना सुद्धा एखाद्या शिवीतून व्यक्त होणारी कोल्हापूर नगरी एकमेवच असेल कदाचित हे ऐकून वाटेल किती गलिच्छ पणा आहे हा पण नाही ओ कधी तरी येऊन बघा त्या मागची काळजी मैत्री तुम्हाला दिसेल खूप सुंदर आहे खरच इथली भाषा कोकणची झळ लागून सुद्धा कोकणी भाषेच्या 'घो' उच्चाराचा इथे लवलेश ही नाही हे विशेष !!!
बाकी कृष्णा, कोयना, कावेरी,तुळसी, भोगावती नद्यांचा संगम असणारया पंचगंगेच्या पाण्याने या भाषेला आणखी रोचक आणि उठावदार करते पंचगंगेच्या पाण्यासारखी खळखळणारी भाषा ऐकायला ही खूप मस्त वाटते.
आलेलो - आलतो
गेलेलो - गेलतो
आहेस - हैस
होय - व्हय
बहीण - भन
मोठी - थोरली/थोरला
लहान - न्हादंगा/धाकटा
बैल - खोंड
खांब - डांब
कधी - कवा
फोड - फॉड
कुठे - कुठं
ठोसे - टिप्पीर
बाद (स्वभावाने) - कडू,कडवं
भुवया - भुया
पुढील - पुढच/म्होरल
झिंकले! - झिकले!
मागील - मागल
नंतर देतो - मागणं देतो
खोट बोलू नकोस - लबाड बोलू नघोस
चड (extra) - आगाव
कोई (आंबा बी)- कुई
आप्पे rickshaw - वडाप
S.T (सरकारी गाडी) - इष्टी
थोडस - लिंबवा येवढं/नकायेवढं/आबुट
कधीपासून - कवापस्नॅ
तेंव्हापासून - तवा
बघा आता - बघा आबा
मी - मिन!
तू - तुन!
चहा - चा!
तुम्हाला - तुमास्नी
कुठे आहेस - कुठाईस
बारीक (शरीराने) - छलकाड
खालून - खायन
वरून - वर्ण
आलास होय! - अलईस व्हय!
असे का करतोय - असाका करायलईस रे!
करतो आहे - करालोय न्हवका
रस्त्यावरून कुठे - रस्त्यावरन कुठं
चिकन/मटण - खाटखुट/टिनमी
फांदी - ढामपी
पातेलं - भुघून/पात्याल
फसवलं - गंडवलं
तेल - त्याल
द्रोण - दुरून
आमटी - शाक/कोरड्यास
कोथिंबिर - कोतमीर
निकामी - बिनकामाच
भानगड - साटलोट/लडतर/झोंबड
थाप - वावडी
झाडू - साळूता
बोलवलंय - बलीवलंय
करतोय - करायलय
पायंडल - फ्याण्डल
पोहे - फव
रव्याचे लाडू - गऱ्याचे लाडू
करंज्या - कानुले
कडबोळी - खडूकळी
हुशार - चापटर
पिरवाडी (ठिकाणा चे नाव) - पिराची वाडी
No comments:
Post a Comment