स्वराज्याचे ज्यावेळी विभाजन झाले त्यावेळीची ही गोष्ट आहे ...... कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या उदयास आल्या कोल्हापूर च्या गादीवर छत्रपती शाहू महाराज विराजमान झाले ... त्यांची कीर्ती सर्वश्रुत होती छत्रपतींच्या विचारांचा आणि घरण्याचा वारसा ते आपल्या लोकसेवेतून पुढे चालवत होते .
पण चंद्राला आणि सर्वतेजोनिशी झळकणार्या सूर्याला सुद्धा ग्रहण लागत मग माणसाचं काय !! शाहू महाराजांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणारे ही काही प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले होते याचा उल्लेख हिंदुराव साळुंखे यांच्या 'स्मृती दर्शन' या पुस्तकात वाचायला मिळतो.........
ते लिहतात भटक्या आणि विमुक्त जातींसाठी तसेच समाजात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी कोल्हापूर च्या पूर्वाधात एक सोनतळी नावाचं गाव वसवले होते तिथे घोड्यांची पैदास होत असे ,शाहू महाराजांचा तिथे बांगला ही होता , महाराजांना वैद्यांनी वजन कमी करायचा सल्ला दिल्याने ते आठवड्यातून 3 ते 4 वेळा तिथे जात असत कारण त्या बंगल्याच्या अंगणात एक दगडी घसरगुंडी त्यांनी बनवली होती ज्यावर चढून घसरल्याने शरीराला घाम जास्त येईल आणि वजन उतरण्यास मदत होईल अशी त्यांची धारणा होती . हिंदुरावांनी त्या गावाला भेट दिली आणि तिथे त्यांची भेट महाराजांच्या चाकरीतल्या एका माणसाबरोबर पण झाली जो आता खूप वयोवृद्ध झाला होता , त्याने हिंदुरावांना तो बांगला दाखवला आणि ती घसरगुंडी सुद्धा ........
